रुत्नागिरी : हापूस! सर्वांना हवाहवास वाटणारा. कोकणचा हापूस सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो टन हापूस परदेशी रवाना होतो. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील हापूसला मोठी मागणी. अगदी डझनचा पाच रूपये मोजून देखील हापूस खरेदी केला जातो. पण, तुम्हाला कुणी हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 1 लाखाचा दर मिळाला असं सांगितलं तर कदाचित विश्वास नाही बसणार! पण, हे शक्य झालं आहे. ते देखील मुंबईत. कोकणच्या या राजाला पाच डझनच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा दर मिळाला आहे.
मुंबईच्या अंधेरीतील मॅरिएट हॉटेलमध्ये शुक्रवारी हापूसचा लिलाव झाला. त्यावेळी रत्नागिरी, देवगड, राजापूरातील 10 आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजापुरातील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला किमान शतकातील अर्थात 1 लाख 8 हजाराचा दरविक्रमी दर लिलाव पद्धतीनं मिळाला आहे. शेतकऱ्यांचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी मायको ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. या लिलावातील सहभागी हापूस उत्पादकाला प्रत्येकी 31 हजार रूपये मिळाले.
दरम्यान, सध्याच्या घडीला हापूसवर निसर्गाची वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असून त्याचा उत्साह यामुळे नक्कीच वाढणार आहे. या साऱ्याकरता चिपळूणमधील आमदार, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, ग्लोबल कोकणचे प्रमुख संजय यादवराव, किशोर धारिया, माजी नगरसेवक आणि मुंबईतील हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, हापूस आंब्याचे एक्सपोर्टर दीपक परब यांनी पुढाकार घेतला होता.
शेतकऱ्यांचा सहभाग
या कार्यक्रमात शेतकरी देखील सहभागी झाले होते. यावेळी 10 शेतकऱ्यांना प्रत्येकी 31 हजार रूपये लिलावाअंती देण्यात आले होते. कोकणातील शेतकऱ्याचा आत्मविश्वास दुणावला जावा. हापूसला आणखी चांगला दर मिळाला यासाठी हा लिलाव करण्यात आला होता. देवगड तालुक्यातील सौंदळ गावामधील नाना गोखले, राजापूर तालुक्यातील पडवे, कुंभवडे, शिरसे, वाडा तिवरे, वेल्ये,रत्नागिरी या ठिकाणचे जवळपास दहा शेतकरी यावेळी सहभागी झाले होते.
निसर्गाची हापूसवर अवकृपा