मुंबई : गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस झाला असल्याचा दावा स्कायमेटनं केला आहे. 24 तासात याठिकाणी 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
माथेरानसोबतच महाड, माणगाव, पोलादपूर या परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय कर्जत, उरण परिसरातील रिमझिम पाऊस होतोय. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 48.19 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून माथेरान येथे सर्वाधिक 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
येत्या तीन दिवसात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
24 तासात माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पावसाची नोंद : स्कायमेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2018 05:19 PM (IST)
गेल्या 24 तासात रायगडमधल्या माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस झाला असल्याचा दावा स्कायमेटनं केला आहे. 24 तासात याठिकाणी 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -