पुणे : पुण्यातील चांदणी चौकात शेकडो कोटी रुपये खर्च करून (Chandani Chawk Flyover)  उभारण्यात आलेल्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी पुणेकरांची अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा उलटंच चित्र पाहायला मिळत आहे. चांदणी चौकात सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडीचा अनुभव वाहनचालकांना येत आहे. त्यामुळे या पुलावर पुणेकरांनी चांगलीच नाराजी दर्शवली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्यात राजकीय नेत्यांनीदेखील ट्विट करत या पुलाच्या रचनेवर आणि पुण्याच्या वाहतूक कोंडीवर टीका केली आहे. मात्र या वाहतूक कोंडीची काही प्रमुख कारणं आहेत. 


 चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची काही प्रमुख कारणं...


-चांदणी चौकातील पुलाची चुकलेली रचना
-उद्घाटन झालं मात्र खडलेली कामे 
-चांदणी चौकातील प्रकल्पाचे 12 ऑगस्टला गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले असले तरी भुसारी कॉलनी ते मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम आत्ता सुरु करण्यात आलं आहे. 
-चांदणी चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आधी कुठलीही सोय करण्यात आली नव्हती. 
-ही चुक लक्षात आल्यानंतर आता फुट ब्रिज बांधण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे.
-मुंबईकडून पुण्यातील पाषाण- बावधनकडे जाणाऱ्या रस्तावरची वाहने एकमेकांना क्रॉस होत असल्याने तिथे भिंत बांधून एक बाजू बंद करायचं एन एच ए आय ने ठरवलं आहे.  
-या रखडलेल्या तीन कामांमुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी होत आहे.



पालिका तोडगा काढणार?


महापालिका यावर तोडगा काढणार आहे. महापालिकेकडून नकाशे तायर करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांसाठी अधिक सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत. पादचाऱ्यांना या चौकातून सोयीचे व्हावे, यासाठी प्राधान्याने उपाय योजना केल्या जाणार आहेत.  यामुळे नागरिकांना विशेषतः पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.


कसा आहे चांदणी चौकातील पूल?



उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.


इतर महत्वाची बातमी-