Tuljapur: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. या मंदिराच्या गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम सुरु व्हावे अशी मागणी पुजारी मंडळाकडून केली जात असताना आता मंदीराच्या प्राचीन गाभाऱ्याच्या शिळांना तडे जाण्याचं खरं कारण समोर आलं आहे. नव्या कळसाचे वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्याने हा भार गाभाऱ्यावर पडून शिळांना तडे गेले, असा खुलासा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केला आहे. गाभाऱ्याच्या दगडी शिळांना तडे गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असून पुरातत्व विभागाची तज्ञ टीम आणि जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री सरनाईक यांनी मंदिराच्या गाभाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम व्यवस्थित सुरू असून, भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Tuljabhavani Temple Cracks)


नक्की झाले काय होते?


तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शेळ्यांना तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत उघड झाली होती .मंदिर गाभार्‍यातील फरशी व मुलांना दिलेला भाग काढून टाकल्यानंतर काही शिळा खचले आहेत तर काहींना तडे गेले आहेत .तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धन म्हणजेच जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या निग्रणीखाली सुरू असताना हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली .महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम मंदिर संस्थांच्या 65 कोटी रुपयांच्या स्वनिधीतून सुरू आहे .असे असताना हा प्रकार घडल्याने मंदिर प्रशासनाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी होत आहे.दरम्यान, या शिळा कशा खचल्या याचे कारण खुद्द पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. नव्या कळसाचे वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्याने हा भार गाभाऱ्यावर पडून शिळांना तडे गेले असल्याचे सांगण्यात आले असून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम अतिशय व्यवस्थितपणे चालू असून भाविकांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही असेही सांगण्यात आले आहे.


तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून पोलीस अधीक्षकांना खडसावले


तुळजापूरसारख्या पवित्र देवस्थानाजवळ ड्रग्सचा गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिस अधीक्षकांना खडसावले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले असून, ड्रग्सचा व्यापार कोणाच्याही दबावाखाली येऊन सोडला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.पालकमंत्र्यांनी "कोणी कितीही मोठा असला तरी सुटणार नाही. तुळजापूरसारख्या धार्मिक ठिकाणी ड्रग्सचा व्यापार सुरू असेल, तर त्याला नेस्तनाबूत करा", असे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षकांना दिले. तुळजापुरातील पुजाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्यानंतर सरनाईक आक्रमक झाले. "पुजाऱ्यांकडून तुम्हाला तक्रार देऊनही जर तुम्ही कारवाई करत नसाल, तर हे दुर्दैवी आहे. जर गरज भासली, तर आम्हालाच तुमच्यावर कारवाई करावी लागेल", असा इशाराही त्यांनी दिला.


 



हेही वाचा:


Pratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं