अकोला : राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागातील चार पदांसाठी लेखी परीक्षा होत आहे. मात्र, 16 आणि 17 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या या लेखी परीक्षेचा खेळखंडोबा होण्याची भिती निर्माण झाली आहे. 16 आणि 17 ला जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील चार पदांच्या 5300 जागांसाठी ही मेगाभरती होत आहे. मात्र, यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाने 29 सप्टेंबरलाच एक शासन परिपत्रक काढलं होतं. यात परीक्षा पुढे ढकलल्याचं म्हटलंय. मात्र, विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ असल्याची परिस्थिती आहेय. 


राज्य सरकारने जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तब्बल 5300 पदांची मेगाभरती काढलीय. यासाठी चार पदांसाठी सप्टेंबरमध्ये सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांमार्फत स्वतंत्र जाहिराती काढल्या होत्या. औषध निर्मिता, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक या चार पदांसाठी ही परीक्षा होत आहे. मात्र, सरकारच्या वेबसाइटवर अद्याप परीक्षा ओळखपत्राचा (हॉल तिकीट) पत्ता नाही. परीक्षा ओळखपत्र मिळत नसल्याने राज्यातील लाखो परीक्षार्थी चिंतेत आहेत. 


यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी 'एबीपी माझा'शी संपर्क साधला होता. आम्ही या प्रकाराची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला आमच्या हाती यासंदर्भातील ग्रामविकास विभागाचं 29 सप्टेंबरचा एक शासन आदेश मिळालाय. जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत 16 आणि 17 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या 5300 जागांसाठीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं या पत्रात म्हटलंय. यासाठी आरोग्य विभागाच्या रद्द करण्यात आलेल्या याआधीच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला होत असल्याचं कारण देण्यात आलं. 24 आणि 31 ला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठीचे केंद्र आणि 16 आणि 17 ला होत असलेल्या जिल्हा परिषद परिीक्षांसाठीचे केंद्र आणि त्यासाठी लागणारी सामग्री एकच असल्याचं कारण देण्यात आलंय.  यासंदर्भात कोणतीच माहिती दिली गेली नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा केला आहे.


 
  पद, परीक्षेची तारीख आणि वेळ 


पद                         तारीख              वेळ
प्रयोगशाळा तंत्रज्ञ     16 ऑक्टोबर   दुपारी 3 ते 5
आरोग्यसेवक           17 ऑक्टोबर   सकाळी 11 ते 1
आरोग्यसेविका          17 ऑक्टोबर   सकाळी 11 ते 1
आरोग्य पर्यवेक्षक      17 ऑक्टोबर   दुपारी 3 ते 5


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI