मुंबई : राज्यात आज 1913 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1685 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,28, 603 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 12,587 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 12,587 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6087  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2298  सक्रिय रुग्ण आहेत. 


 गेल्या 24 तासात देशात 10 हजार 649 नवीन रुग्णांची नोंद (Coronavirus Cases in India)


 गेल्या 24 तासात देशात 10 हजार 649 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, काल देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळून आले होते. काल देशात 8 हजार 586 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामध्ये वाढ झाली आहे.  दरम्यान, आत्तापर्यंत देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा 4 कोटी 43 लाख 68 हजार 195 वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळं 5 लाख 27 हजार 452 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अशातच दिलासादायक बातमी म्हणजे देशातील रिकव्हरी रेट वाढला आहे. देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. पण यापैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 33 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 88.35 कोटींहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट हा सध्या 3.32 टक्के आहे. तर  रोजचा पॉझिटीव्हीटी रेट हा 2.62 टक्के आहे.