Ravindra Chavan :  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे. दोन नंबर तो दोन नंबरच असतो, नंबर दोनला काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या नेमका रोख कुणावर? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

Continues below advertisement


जो भी है देवाभाऊ ही है, देवा भाऊ सबका भाऊ दोन नंबर तो दोन नंबरच असतो 


दोन नंबर तो दोन नंबरच असतो, नंबर दोनला काही किंमत नसते असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हंटलंय. आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देऊन रवींद्र चव्हाण यांनी विटा मधील नगरपरिषदेच्या प्रचारसभेत हे वक्तव्य केलं आहे. रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याच्या नेमका रोख कुणावर याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जो भी है देवाभाऊ ही है, देवा भाऊ सबका भाऊ दोन नंबर तो दोन नंबरच असतो असेही रवींद्र चव्हाण म्हणाले. 


मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायचीय, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याची चर्चा


भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असले तरी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आलेत. कोकणात तर या दोन्ही पक्षातील वाद एवढा विकोपाला गेलाय की, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट युती कधीपर्यंत टिकवायची याची तारीखच जाहीर केली आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्याविरोधात त्यांचे बंधू तथा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दंड थोपटले आहेत. नुकतंच निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाखांची रोकड शोधण्याचे स्टिंग ऑपरेशन केलं. हे ऑपरेशन भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट, 'मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटं आहे.' अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.


महत्वाच्या बातम्या:


आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण