Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पर्यटकाने स्टंटबाजी करताना आपली गाडी थेट समुद्रात नेल्याचं पाहायला मिळालं. या गाडीला अखेर जलसमाधी मिळाली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण गाडी पाण्यात बुडाली आहे.
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी आणि भरधाव वेगात वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यास बंदी असतानाही नियमांचा सर्रास भंग केला जात आहे, त्यामुळे पर्यटनासोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली