यानंतर हा तपास रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाकडे आला. तपासात स्मिता कुसूरकर यांचा मोबाईल शेवटचा रत्नागिरीमध्ये वापरल्याचं समोर आलं. शेवटचं संभाषण संगमेश्वर इथल्या श्रीकांत घडशी या इसमाशी झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी श्रीकांत घडशीचा माग काढल्यावर तो गायब असल्याचं समजलं.
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून मुंबईतून पकडलं. यानंतर आपणच स्मिता कसूरकर यांची हत्या केल्याची कबुलही दिली. स्मिता कसूरकर यांची हत्या करुन मृतदेह संगमेश्वर नजीकच्या चिरे खाणीत टाकल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी चिरे खाणीतून मृतदेह बाहेर काढून तो स्मिता कसूरकर यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
स्मिता कसूरकर यांनी जमीन व्यवहारात काही लाख रुपये अदा केल्याची माहिती पुढे आलं आहे. दरम्यान त्यांची हत्या करणाऱ्या श्रीकांत घडशी याच्यावर याआधी स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.
