रत्नागिरी : चाकूने वार करुन सासूनेच सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या वालोपे देऊळवाडीत शनिवारी हे हत्याकांड घडलं आहे.
सासूने रागाच्या भरात सुनेच्या अंगावर सुरीने 25 ते 30 वार केले. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे कुटुंब मूळच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाघझरी गावातलं आहे. मात्र रत्नागिरीत भाड्याने घेतलेल्या घरात राहतं.
सासूच्या हल्ल्यात 24 वर्षांची सून परी प्रशांत करकाळे मृत्युमुखी पडली. 50 वर्षीय आरोपी सासू रेणुका नामदेव करकाळेला पोलिसांनी अटक केली आहे. सुनेला दोन लहान मुलं असल्याची माहिती आहे.