Rashtriya Samaj Paksha : ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) प्रश्नासह विविध मागण्यांच्या मुद्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष (Rashtriya Samaj Paksha) आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं येत्या 5 ऑगस्टला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दिल्लीच्या जंतर मंतर (Jantar Mantar) मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात होणार आहे. संसदेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येमार आहे.
विविध मुद्यावरुन राष्ट्रीय समाज पक्ष चांगलाच आक्रम झाल्याचे दिसत आहे. विविध मागण्यांसाठी 5 ऑगस्टला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. जातनिहाय जनगणना करणे, ओबीस आरक्षण कायम करणे, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात संपुर्ण देशातून लोक सहभागी होणार आहेत. या मोरचात सहभागी होण्यासाठी बारामती मधून देखील मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी दिली आहे. मोठ्या संख्येनं नागरिकांनी या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या ?
जातनिहाय जनगणना करणं
ओबीसी आरक्षण कायम करणं
नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करणं
50 टक्के सिलींग हटवा
सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणं
न्याय व्यवस्था, सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणं
धान्य मालाला हमीभावानं खरेदीची हमी
महागाई थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावी
संपूर्ण मोफत शिक्षण द्यावं
मोफत आरोग्य सुविधा द्यावी
अशा प्रमुख मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला आहे. संसदेवर हा मोर्चा काडम्यात येणार आहे. त्यामुळं मोठ्या संख्यनं नागरिकांना या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळं आता या मोर्चाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सरकार या मोर्चावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: