Nagpur University News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) एका प्राध्यापकावर खंडणी वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांनी एका प्राध्यापकाविरोधात हा आरोप केला आहे. याप्रकरणी प्राध्यापकांनी कुलगुरुंकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती निर्माण करुन एका प्राध्यापकाने लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप या सातही प्राध्यापकांनी तक्रारीत केला आहे.


एका प्राध्यापकाने लैंगिक छळाच्या तक्रारीचा बहाणा करुन आमच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप सात प्राध्यापकांनी केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनं नागपूर विद्यापीठात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्राध्यपकाविरोधात सातही प्राध्यापकांनी कुलगुरुंकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.


नेमके काय आरोप करण्यात आले होते?


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांविरोधात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाची तक्रार आली आहे, अशी भीती एका प्राध्यपकाने निर्माण केली होती. ही भीती निर्माण करुन त्या प्राध्यापकाने सात प्राध्यपकांकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली आहे. याप्रकरणी सातही प्राध्यापकांनी लेखी स्वरुपातील तक्रार कुलगुरुंकडे दाखल केली आहे. दरम्यान, प्राध्यपकाने भीती निर्माण करुन लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्यामुळं, त्याची चौकशी करावी अशी मागणी सातही प्राध्यपकांनी लेखी तक्रारीत केली आहे. तसेच त्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात यावं आणि त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या लेखी तक्रारीत करण्यात आली आहे. 


 16 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप


कुलगुरुंकडे तक्रार दाखल केलेले सातही प्राध्यापक हे नागपूर विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक आहेत. या सातही प्राध्यपकांनी एकत्र येऊन एका प्राध्यपकाच्या विरोधात कुलगुरुंकडे तक्रार दाखल केली आहे. या सातही प्राध्यपकांविरोधात मुलींकडून लैंगिक छळाची तक्रार आली आहे, अशा प्रकारची भीती दाखवली जात होती. ही भीती निर्माण करुन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले आहे. पाच प्राध्यपकांकडून जवळपास 16 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यात आल्याचा आरोप या प्राध्यापकांनी लेखी तक्रारीत केला आहे. त्यामुळं कुलगुरुंनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सातही प्राध्यापकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण या प्रकारामुळं नागपूर विद्यापीठात खळबळ निर्माण झाली आहे.   


महत्त्वाच्या बातम्या:


Parambir Singh: परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील दोन निलंबित पोलीस पुन्हा सेवेत, अटकेनंतर करण्यात आली होती निलंबनाची कारवाई