Rashmi Shukla phone tapping case : सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील बड्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये त्यांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला आहे. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. 


शिंदे -फडणवीस सरकारला धक्का 


शिंदे-फडणवीस सरकारने रश्मी शुक्ला यांचा तपास बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला धक्का असल्याचं बोललं जात आहे. 


काँग्रेसचे तत्कालीन मंत्री नाना पटोले,संजय राऊत, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांच्यासह अनेक दिग्गज आमदार आणि खासदारांचे रश्मी शुक्ला याच्यावर आरोप आहेत. कुलाबा पोलिसांनी 2019 मध्ये या नेत्यांचे फोन टॅप केल्याबद्दल शुक्ला यांच्याविरुद्ध मार्चमध्ये गुन्हा दाखल केला होता.  राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती.


रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये कार्यरत आहेत.  मुंबईच्या आयुक्तपदी म्हणून राज्यात पुन्हा नियुक्ती होणार असल्याची  शक्यता असल्याची चर्चा होती. शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती.त्यानंतर त्यांनी दिल्लीतदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रातदेखील त्यांची चर्चा झाली होती. मात्र आता न्यायलयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळल्याने शिंदे फडणवीस सरकारला चांगलाच धक्का मानला जात आहे. 


रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?


- रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. 
- फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते.
- राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.