बीड : महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा आष्टी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.


परळी ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अत्याचार केल्याचा आरोप महिला पोलिसाने केला. गवळी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना वॉकीटॉकीची बॅटरी संपल्याचे कारण सांगून घरी बोलावले आणि इतर दोघांच्या मदतीने अत्याचार केला, असा आरोप महिला पोलिसाने केला.

चार महिन्यांपूर्वी कार्यालयीन कामाच्या निमित्ताने घरी बोलावून बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. महिलांवर अत्याचार होत असेल तर सर्वसामान्य लोक पोलिसांकडे दाद मागतात. मात्र आता पोलीस खात्यातील महिलाच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.