बुलडाणा : बुलडाण्याच्या खामगावातील गणेशपूरमध्ये एका आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे.

शाळेतील कर्मचाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप मुलीने केला आहे. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : मलिक

दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे, असं सांगत आदिवासी मंत्री आणि महिला बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही नवाब मालिक यांनी केली.