नागपूर: कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडलेल्या नागपूरमध्ये बलात्कारांचे सत्र अजूनही सुरूच आहे. शहरातल्या जुना बगडगंज वस्तीत एका अल्पवयीन मुलीवर घरमालकाच्या नातेवाईकानं बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली.


 

घरात कोणी नसल्याची संधी साधून 22 वर्षीय राहुल भिवगडेनं दुपारी या मुलीवर बलात्कार केला. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीनं याबाबत कोणालाही सांगितलं नाही. मात्र, रात्री तिला त्रास होऊ लागल्यानं हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीनं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

नागपुरात ५ दिवसापूर्वी इमामवाडा परिसरातील टीबी वार्डमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. नागपुरात एका आठवड्यात अल्पवयीन मुलींवर असा दुर्दैवी प्रसंग ओढावल्याची ही दुसरी घटना आहे.