अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात, आरोपी फरार
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2016 03:35 AM (IST)
अहमदनगर: अहमदनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून या पीडितेवर अत्याचार सुरु होते. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पीडित मुलीचं शिक्षण सुरु असून तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचं समजतं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाचा आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टराचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.