हेडलाईन्स:


 
1. येत्या 24 तासात कोकण आणि मुंबईत जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी, तर यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

----------------------------

2. मुंबईत रात्री दमदार पाऊस, दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात पावसाचा जोर, अंधेरीत पाणी साचलं मुंबईकरांची कसरत, ठाणे आणि नवी मुंबईलाही पावसानं झोडपलं...

----------------------------

3. निमंत्रण पत्रिकेवर पुणे महापौरांचं नाव नजरचुकीनं राहिलं, पुण्यातल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाकडे सर्व पक्षांनी पाठ फिरवल्यावर भाजपची सारवासारव

----------------------------

4. दिघ्यातील आणखी दोन इमारती खाली करण्याचं हायकोर्टाचं फर्मान, ऐन पावसाळ्यात भगत आणि मोरेश्वर इमारतीचे रहिवाशी बेघर होणार

----------------------------

5. भाजप सरकार सेनेच्या पाठिंब्यावर आहे ते विसरू नका, उद्धव ठाकरेंवरील टीकेनं शिवसेना खवळली, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन

----------------------------

6. धुळ्यात अवैध प्रवाशी वाहतुकीचे 18 बळी, सूरत-नागपूर हायवेवर ट्रक आणि ट्रॅक्सची समोरासमोर धडक, परिसरावर शोककळा

----------------------------

7.  शिर्डीत ड्रेनेजमध्ये जीव गुदमरुन 4 शेतकऱ्यांचा मृत्यू, विषारी वायूनं 4 कुटुंबं उध्वस्त, परिसरावर शोककळा

----------------------------

8. ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय, भारताचं 4 लाख कोटीचं नुकसान, ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरुन राजीनामा देणार

----------------------------

9. भारताचं एनएसजी सदस्यत्वाचं स्वप्न भंगलं,एनसजी सदस्य देशांच्या बैठकीत भारताच्या अर्जावर निर्णय नाही, चीनच्या विरोधाची भारताकडून दखल

----------------------------

10. महाराष्ट्राचा काशिलिंग आडके बनला दिल्लीचा दबंग, प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात दमदार कामगिरीचा काशिलिंगला विश्वास