जालना: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लक्ष्मी दर्शन वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा विवादास्पद वक्तव्य केलं आहे. आजही दानवेंनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत.

नरेंद्र मोदींनी जनधन खाती उघडल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात पाच हजार रुपये जमा केले आहेत. असा दावा त्यांनी केला आहे. जालन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाऊन हाल सभागृहात आयोजित प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या शुंभारभ कार्यक्रमात दानवे बोलत होते.

विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात 'लक्ष्मी दर्शन घ्या' असा सल्ला दिल्याप्रकरणी कालच त्यांच्यावर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील असं आश्वासन दिलं होतं. इथं दानवेंनी मात्र पाच हजार जमा झाल्याचा दावा केला आहे.