औरंगाबाद: ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नासाठी शाही थाट सुरु आहे. या लग्नासाठी तब्बल दीड लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या.


रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवेंचं आज औरंगाबादमध्ये लग्न आहे. त्यासाठी भव्य अशा राजमहलाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. संतोष दानवेंच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर नेते मंडळी औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरातील सर्व हॉटेल्स पाहुण्यांसाठी बूक करण्यात आली आहेत. तर लग्नाला येणाऱ्यांसाठी शाही भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्याला अशी कोट्यवधींची उधळपट्टी शोभते का? असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.

संबंधित बातम्या:

...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत!

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ‘मातोश्री’वर