जालना: 'लोकांना जी भाषा कळते तिच भाषा आम्हाला वापरावी लागते.' असा खुलासा रावसाहेब दानवे यांनी जनधन खात्याच्या संबंधी केलेल्या वक्तव्याबाबत केला आहे. ते काल जालनामध्ये बोलत होते.
बँकेने कोणाच्याही खात्यात पैसे सीसी केले किंवा ओडी केले हे ग्रामीण भागातील लोकांना कळत नाही. त्यामुळे सरकारने पैसे जमा केले असे शब्द आपण वापरल्याच दानवे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनधन खात्यात ५ हजार रुपये जमा केल्याच वक्तव्य करून दानवेंनी खळबळ उडवून दिली होती. जालना येथे वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संबंधित बातम्या:
मोदींनी सर्व जनधन खात्यात 5-5 हजार टाकले: रावसाहेब दानवे