Ranjit Savarkar On Majha Katta:  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swatantraveer savarkar) नातू रणजित सावरकर हे नेहमीच त्यांच्या थेट बोलण्यामुळं आणि दाव्यांमुळं चर्चेत असतात.  याच रणजित सावरकर यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी रणजित सावरकर यांनी अनेक दावे करत काँग्रेस, महात्मा गांधी, पंडित नेहरुंवर टीका केली आहे.  स्वातंत्र्यांच्या क्रांतिकार्यात सहभागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पोलीसांच्या फाईलमध्ये दफन झालेले सगळे जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा, सत्य समोर येईल असाही दावा रणजित सावरकर यांनी केला आहे. नेहरुंनीच फाळणी मान्य केली असल्याचा दावा देखील रणजित सावरकरांनी केला. सावरकर अखंड भारतासाठी भांडत होते, असंही ते म्हणाले.


गांधी हत्या अन् पिस्तुल कनेक्शनवर काय म्हणाले रणजित सावरकर


रणजित सावरकर म्हणाले की, महात्मा गांधींच्या हत्येमागे काँग्रेसचाच हात आहे, असा खळबळजनक दावा एबीपी माझाच्या कट्ट्यावर रणजित सावरकर यांनी केला आहे. रणजित सावरकर म्हणाले की, जगदीश गोयल या माणसाने पोलिसांनी सांगितलं होतं की, हे पिस्टल मला नाथिलाल जैन नावाच्या माणसाने दिलं आहे. पोलिसांनी नाथिलाल जैन या माणसाला अटक केली होती. तो लाल किल्ल्यातच होता. त्याला पोलिसांनी हजरच केलं नाही.  याला कारण असं आहे की डॉ परचुरे ज्यांच्यावर आरोप होता की, गंगाधर दंडवतेंनी पिस्तुल घेतलं आणि मग ते नथुराम गोडसेला दिलं. परचुरे यांचे वकील पु. ल इनामदार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, नाथिलाल जैन हा ग्वाल्हेरच्या काँग्रेस मंत्र्यांचा मेव्हणा होता. नाथिलाल जैननं हे पिस्तुल कुठुन आणलं. कारण हे पिस्तुल इटालियन आर्मी इशू आहे. इटालियन आर्मी इशू आलं कुठुन? मला खात्री आहे की पोलिसांकडे या जबान्या असणार आहेत. मात्र या प्रकरणाचे थेट धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहोचत होते, म्हणून नाथिलाल जैनला कोर्टात हजरच केलं नाही. वकील इमानदारांनी कोर्टात बाजू मांडताना आरोप केला आहे की, पोलिस हे जाणीवपूर्वक करताहेत. ते एक पोकळी ठेवत आहेत, गोंधळ निर्माण करण्याकरता. ही पोकळी पुढे तशीच राहिली. आज काही उत्तर मिळालं नाही की सावरकरांचं नाव घेतलं जातं. पोलिस रेकॉर्डमध्ये हे सगळं दफन झालं आहे, असा आरोपही रणजित सावरकर यांनी केला आहे. 


रणजित सावरकर म्हणाले की,  स्वांतत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते, तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने होते. गांधींचा जातीभेदावर विश्वास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती. गांधींजी तेव्हा चातुर्वर्णाच्या बाजूने होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्यांच्या क्रांतिकार्यात सहभागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पोलीसांच्या फाईलमध्ये दफन झालेले सगळे जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा, सत्य समोर येईल, असं रणजित सावरकर म्हणाले.  


ही बातमी देखील वाचा


क्रांतिकार्यातील सावरकरांच्या सहभागाबद्दल जर जाणून घ्यायचंय तर जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा : रणजित सावरकर