उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीवरुन भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना खासदारांच्या गटांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसेनेकडून कळंब पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. आपले पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील आणि अकलूज मधल्या कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेप्रकरणी 19 जणांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


कळंब पंचायत समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10, आणि सहा सदस्य शिवसेनेचे आहेत. यातील राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाचे कळंब इथले पंचायत समिती सदस्य शिवसेनेनी पळवले. पळवलेले सदस्य परत आणण्यासाठी गेलेल्या राणा जगजीतसिंह पाटील आणि अकलूज मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवर्सन हाणामारीत झाले. यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावले. या प्रकरणी राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांच्या विरोधात अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी राणा जगजितसिंह पाटील यांच्या चार समर्थकांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet : ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाची ठळक वैशिष्ट्ये

यावेळी दोन्ही गटाकडून झटापटी झाल्या. धमकी देऊन मारहाणीचे प्रकार घडल्याने अकलूज पोलिस ठाण्यात आमदार पाटील यांच्यासह 18 जनावरही गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी पंचायत समिती सभापतीची निवड प्रक्रिया होत आहे. त्यामुळे आता पंचायत समिती कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा - महाविकासआघाडीच्या 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांकडून शपथ

राणा जगजीतसिंह पाटील यांचे पारडे जड -
कळंब पंचायत समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 सदस्य आहेत. जे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या गटाचे मानले जातात. तर, शिवसेनेचे सहा सदस्या आहेत. उद्या मंगळवारी पंचायत समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. त्यामुळे आता या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Jayant Patil | गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर कळेल : जयंत पाटील | ABP Majha