गोंदिया : गोंदियाच्या (Gondia) नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कालीमाती संरक्षण कुटी परिसरात एका वाघाचा मृतदेह आढळला आहे. दोन वाघांच्या झालेल्या झुंजीत या नर वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. झुंजीदरम्यान, त्याच्या डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमीक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मृत वाघ अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा व 130 किलो वजनाचा नर वाघ
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान अंतर्गत कालीमाती संरक्षण कुटी येथील वनरक्षक आणि संरक्षण मजूर यांनी वाघांच्या डरकाळीचा आवाज ऐकला. दरम्यान, वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना गवतामध्ये सदर वाघ जखमी अवस्थेत आढळला. याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना दिली. माहिती मिळताच क्षेत्र संचालक पियुष जगताप यांनी जलद बचाव दलासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी सदर वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसले. मृत वाघ अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा व 130 किलो वजनाचा नर वाघ असून त्याच्या मानेवर व डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं त्याचा दुसर्या वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद वन्यजीव विभागातर्फे करण्यात आली असून जवळील बकी पर्यटन गेट परीसरात त्या वाघाची उत्तरीय तपासणी करून त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोताळा तालुक्यातील सारोळा पीर शेत शिवारात एक पाच ते सहा वर्ष वयाच्या बिबट्या संशयास्पद मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सारोळा पीर शेत शिवारात एक पाच ते सहा वर्ष वयाच्या बिबट्या संशयास्पद मृत्यू झाला. वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अनेक दिवसापासून सारोळा पीर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा अस्तित्व आढळलं मात्र आज दुपारच्या सुमारासमृत बिबट्या आढळल्याने परिसरात व विशेष करून शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.
महत्वाच्या बातम्या: