रत्नागिरी : कोकणामध्ये (Kokan)  येऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  काय दाखवणार? जेवढे आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा,उद्धव ठाकरेंजवळ काही शिल्लक नाही अशी टीका  शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच या जगामध्ये आपल्या बापाशी बेइमानी करणारी पहिले अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे, असे देखील रामदास कदम म्हणाले. 


रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड मध्ये  रामदास कदम यांचे जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते  यांच्यावर जोरदार टीका रामदास कदम यांनी केली. रामदास कदम यांनी अनंत गीते यांच्यावरही टीका केली.  रामदास कदम म्हणाले, आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक राहिले? कोकणामध्ये येऊन काय दाखवणार? या जगामध्ये आपल्या बापाशी बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे आहे. 


कोकणासाठी काय केलं? : रामदास कदम


अनंत गीते यांच्या टीका करताना रामदास कदम म्हणाले,  सात वेळा खासदारकी भोगली तीन चार वेळा मंत्री झाले. कोकणासाठी काय केलं?  पाऊस पडला की आळंबी उगवतात तसा निवडणुका आल्या की हा माणूस उगवतो. 


उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू : निलेश राणे


सिंधुदुर्गात आज उद्धव ठाकरेंची सभा आहे. उद्धव ठाकरेंच्या  सभेला भाजपाचा विरोध आहे. आमच्या नेत्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्या  केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. 


उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर


शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा तर, राणेंचं होम ग्राउंड म्हणून ओळख असलेल्या कणकवलीत जाहीर सभा होणार आहे.  आमच्या नेत्यांबद्दल काहीही बोलण्यास सभा उधळून लावू; असा  राणे समर्थकांनी इशारा दिला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला महत्व आले आहे.  आजच्या दिवशी म्हणजेच 4 फेब्रुवारी 2023 रोजी आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने भाजपने जाहीर सभा घेतली होती.त्याच वेळेला भाजपने कोकणात लोकसभेची तयारी सुरू केली का? अशी चर्चा सुरू झाली होती.  त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच 4 फेब्रुवारी 2024 रोजी उद्धव ठाकरे कोकणात येत आहेत.  शिवाय यावेळी आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन देखील घेणार आहेत.


हे ही वाचा :


स्वप्नातले पालकमंत्री, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळेना, झेंडे सोडून नॅपकिन फिरवतात, उद्धव ठाकरेंचा भरत गोगावलेंना टोमणा