Uddhav Thackeray On Bharat Gogawale : रत्नागिरी : मला मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) मोह नाही, जबाबदारी आली म्हणून पार पाडली, असं वक्तव्य ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोकण दौऱ्यावर असताना केलं आहे. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला (Shinde Group) टोलाही लगावला आहे. तुमच्या वडिलांचा फोटो लावून मतं मागा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सणसणीत टोला लगावला आहे. स्वप्नातील पालकमंत्री, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळत नाही. झेंडे सोडून नॅपकिन फिरवतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता सणसणीत टोला लगावला आहे. 


ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी जनसंवाद करत नाही, तर मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधतोय. तुम्ही मला आपल्या कुटुंबातला सदस्य मानता, हे माझं भाग्य आहे. 'सरकार आपल्या दारी' आणि लोकं सांगतायत 'जा तुझ्या घरी, आम्ही अन्यायावर वार करणारे 'वारकरी'. भ्रष्टाचार करा, भाजपात या, ही मोदी गॅरंटी आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःकडे घेते आणि पावन करते. महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणारे मंत्री दिल्लीत आपल्या राज्याच्या दुरावस्थेबद्दल का बोलत नाहीत? ते खोके गिळून गप्प बसलेत. मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. पण ज्या ज्या वेळी देशावर संकट आलंय, त्या त्या वेळी महाराष्ट्र धावून गेलाय." 


आम्ही शिवबांचे, भारतमातेचे भक्त आहोत, कुण्या एका व्यक्तीचे भक्त नाही : उद्धव ठाकरे


"तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठाय? आहे तो सगळा 'चोरबाजार' आहे. आम्ही ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेची पालखी वाहू; पण भाजपची पालखी वाहणारे नाही. आम्ही शिवबांचे, भारतमातेचे भक्त आहोत, कुण्या एका व्यक्तीचे भक्त नाही. 'देशभक्त' नेहमी जिंकतो. तुम्ही जनता माझ्यासोबत असताना माझ्यासमोर कुणीही उभा राहू दे. मला पर्वा नाही, तुमचे मित्र म्हणजे देश नव्हे, ही जनता म्हणजे देश आहे. जनतेसाठी काम करा, 'मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे.' आता झोपी गेलास, तर पुढे दिवससुद्धा वैऱ्याचे येतील.", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Raj Thackeray PC : तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर!