Ramdas Kadam on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे देखील कदम म्हणाले. आज दापोली इथे शिंदे गटाची जाहीर सभा आयोजीत केली आहे. या सभेत आदित्य ठाकरेंच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
 
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होताना दिसत आहे. दोन्हीकडचे नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरट टीका केली आहे. शंभर खोके घ्यायची सवय कोणाला आहे, याची पोलखोल आजच्या दापोली येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा 'चिपळूणचा नाच्या' असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली. 


भास्कर जाधवांनी केली होती रामदास कदम यांच्यावर टीका


शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे  हे रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. तसेच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच रामदास कदम यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. रामदास कदमांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली आणि त्यावेळेला ते सातत्याने मीडियाच्या समोर जाऊन डोळ्यामध्ये ग्रीसरीन टाकून ढसाढसा रडण्याचे नाटक करत होते. रामदास कदम यांच्यासारखा खोटा माणूस उभ्या हिंदुस्थानात सापडणार नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती. केशवराव भोसलेचे ड्राव्हर म्हणून शिवसेनेच्या विरोधात प्रचार करीत होतात. मी राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री असताना तुम्ही माझे पाय धरलेत. मी राष्ट्रवादीत येतोय मला तुम्ही विरोध करु नका, राष्ट्रवादीला शिव्या देवून उद्धव साहेबांना बदनाम करु नका. रामदास कदम तुम्ही सांगताय माझ्या पोराला संपवायच काम अनिल परबांनी केलं, उदय सामंतांनी केलं. आज त्याच उदय सामंतांच्या पायावर लोटांगण घातल्याचे भास्कर जाधव म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला रामदास कदम यांनी आज उत्तर दिले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनांच शंभर खोके घ्यायची सवय आहे. याची पोलखोल आजच्या दापोली येथील जाहीर सभेत करणार असल्याचे रामदास कदमांनी म्हटलं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: