Ramdas Kadam on Bhaskar Jadhav : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये गुहागर मतदारसंघात (Guhagar constituency) माझ्या तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, अशी टीका कदम यांनी केली. पण आमच्या एका माणसाला माझी सभा लावायला सांगितली तर तो माणूस हलायला तयार नाही असेही कदम म्हणाले. भावकीत कंदाल नको म्हणून मी नाव सांगत नाही, असंही रामदास कदम म्हणाले.
गुहागर मतदारसंघातील तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरले
गुहागर मतदार संघातील अनेक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत आल्यामुळे तीस ते पस्तीस हजाराचे मतदान आपल्याकडे फिरल्याचे रामदास कदम म्हणाले. त्यामुळं मतदान पाहून विकासकाम करणाऱ्या भास्कर जाधव यांच्याकडे आता काही काम राहिले नाही असा टोला रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना टोला.
योगेश कदमांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठलाय
योगेश कदम यांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा मागत असल्याची टीका रामदास कदम यांनी विरोधकांवर केली. गुहागर विधानसभा मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.
विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले होते. कांदिवलीमध्ये सावली बार असून त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली होती, त्यावेळी 22 बारबाला पकडण्यात आल्या होत्या. या 22 बारबालांसह चार कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना देखील पकडण्यात आल्याचे म्हटले होते. गुन्हाही नोंद करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सावली बार हा ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याची माहिती समोर आली. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत असे अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांना हा मुद्दा लावून धरत योगेश कदम यांनी पदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली जातेय.
महत्वाच्या बातम्या: