Ramdas Athawale On Cabinet expansion : आज नागपूरमध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होत आहे. यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते शपथ घेणार आहेत. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मंत्रीमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळं महायुतीत रामदास आठवले (Ramdas Athawale) नाराज आहेत. मला मंत्रीमंडळ विस्ताराचे निमंत्रण आले नसल्याचे आठवले म्हणाले. मंत्रीमंडळात एक मंत्रीपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचे आठवले म्हणाले. 


म्हाला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान नाही त्यामुळे आम्ही नाराज 


आज मंत्री मंडळाचा विस्तार होतोय, मात्र मला त्याचं निमंत्रणही नसल्याचे आठवले म्हणाले. निवडणुका आल्या की मला बोलावलं जातं. आमच्या पक्षानेही निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. महायुतीचा मोठा विजय झाला महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. लोकसभेला एकही जागा दिली नाही, विधानसभेलाही एक जागा देऊ असे म्हटले. मात्र तसेही झाले नाही. विस्तारा दरम्यान मला एक MLC देऊन एक मंत्रीपद देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र आम्हाला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत असे आठवले म्हणाले. 


मी आता माझ्या पक्षातील नेत्यांन काय तोंड दाखवणार


मी आता माझ्या पक्षातील नेत्यांन काय तोंड दाखवणार. यापुढे होणाऱ्या निवडणुकीत आम्हाला स्थान द्यावे असेही आठवले म्हणाले. फडणवीस यांनी शब्द दिला होता, तो पाळला गेला पाहिजे. माझं फोनवरही त्यांच्याशी बोलणं सुरू होतं असेही आठवले म्हणाले. 


कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे?


भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला  एकनाथ शिंदे यांच्यासह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आला आहे. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाला एकही संधी देण्यात आली नाही. त्यामुळं रामदास आठवले नाराज आहेत. फढणवीसांनी शब्द फिरवला असे आठवलेंनी म्हटलं आहे. त्यामुळं आता आठवलेंच्या या वक्तव्यावर फडणवीस काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Cabinet Expansion: महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला संधी; संपूर्ण यादी एका क्लिकवर!