काल सोमवारी राजू शेट्टींच्या यात्रेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आजही तशीच स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात 22 मेपासून आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली. ज्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे.
केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार येऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळेच आपण आत्मक्लेश करत असल्याचं यावेळी राजू शेट्टींनी सांगितलंय.
दरम्यान आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टींची प्रकृती खालावली होती, तसंच राजू शेट्टींचा मुलगा सौरभलाही काल चक्कर आल्यानं सलाईन लावण्यात आलं होतं.
आत्मक्लेश यात्रेबद्दल काय म्हणाले सदाभाऊ खोत?
खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत मुंबईत यात्रेचं स्वागत करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र सदाभाऊंनी सांगलीत जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं पसंत केलं. राजू शेट्टींच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि आशिर्वाद आहेत, त्यामुळे राजू शेट्टींना काहीही होणार नाही. मी मुंबईत आत्मक्लेश यात्रेचं स्वागत करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र राजू शेट्टी यात्रेतून आणि मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
संबंधित बातम्या