सांगली : सभेला गर्दीच न जमल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी चांगलेच चिडले. सभेला गावकऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांना आपला राग आवरता आला नाही. सांगली जिल्ह्यात कवठे एकंद इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.


आंदोलनात सहभागी होऊन त्याचा फायदा मिळाला पाहिजे, दुसरीकडे लुटीची व्यवस्था संपली पाहिजे असं सांगता, हा डांबिक आणि ढोंगीपणा करणार असाल तर शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कवठे एकंद इथं जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांनी साथ दिली, अनेक लोक सोबत असायचे, पण पहिल्यांदाच उमेदवाराच्या प्रचारासाठी आलो आणि शेतकऱ्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली. शेतकरी आणि आपल्यातलं अंतर वाढलं असल्याबद्दल राजू शेट्टींनी नाराजीही व्यक्त केली.