“वेळ आलीच तर कोणतं खत, कोणतं बियाणं वापरावं याची जाण आहे, कोणत्या पाखरांना हाणायचं कळतं. पीकावर येणाऱ्या पाखरांना हाणण्यासाठी गोफण तयार आहे, ती भिरकावण्यासाठी सज्ज आहे”, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला होता.
सदाभाऊ आणि आमच्यातील मतभेद लवकरच एकत्र बसून सोडवू. संघटनेत मी नव्हे, तर आमची कोअर कमिटी निर्णय घेते, असंही राजू शेट्टी म्हणाले.
संघटनेचा मी प्रमुख म्हणून निर्णय घेतो, ते निर्णय सर्वानुमते घेण्याची आमची प्रथा आहे. भाजपाला दुसऱ्याच्या घरातील वस्तू चोरण्याची सवय आहे, त्यामुळे ते इतरांच्या घरात डोकावतात, अशा घणाघातही राजू शेट्टींनी भाजपवर केला.
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानीमध्ये दुरावा असल्याचं चित्र आहे. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातही दुरावा वाढल्याचीही चर्चा आहे.