सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली आहे. गाव पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंतची सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबत एबीपी माझाने राजू शेट्टी यांच्याशी बातचित केली. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीच्या पहिल्या सत्रात संघटनेच्या पुनर्बांधणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांना प्रमोशन देण्याबाबत, नव्या लोकांना संधी देण्याबाबत चर्चा झाली. त्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, पुढील दोन महिन्यात पक्षाच्या पुनर्बांधणीसंदर्भात कामं केली जातील. त्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात कार्यकारिणीमध्ये गाव, तालुका जिल्हा पातळीपासून राज्य पातळीवरील पदांवर नियुक्त्या केल्या जातील. अनेक नव्या लोकांना संधी दिली जाईल. तसेच जुन्या लोकांचे प्रमोशन केले जाणार आहे.
कार्यकारिणी रद्द का केली? याबाबत शेट्टी यांच्याकडे विचारणा केल्यानंतर शेट्टी म्हणाले की, अनेक लोकांचा त्यांच्या पदावरील दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. तसेच अनेक नव्या दमाच्या नेतृत्वांना संधी द्यायची आहे. पक्षाची पुनर्बांधणी करायची आहे. त्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त, गावांपासून प्रदेश पातळीपर्यंतची सर्व पदे रद्द, राजू शेट्टींचा निर्णय
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
11 Dec 2019 03:39 PM (IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली आहे. गाव पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंतची सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -