पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यात फोनवरुन जोरदार खडाजंगी झाली. ऊसाला एफआरपी देण्याच्या मागणीवरुन ही बाचाबाची झाली आहे.
पुण्यातील साखर संकुलात राजू शेट्टी आणि साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्यात बैठक सुरु होती. या बैठकीत एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. साखर आयुक्तांनी एफआरपी थकवलेल्या कारखान्यांच्या चेअरमनशी खासदार राजू शेट्टींचं फोनवरुन बोलणं करुन देण्यास सुरुवात केली.
त्यापैकी एक फोन उस्मानाबादच्या भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन तानाजी सावंत यांना लावण्यात आला. यावेळी तानाजी सावंत आणि राजू शेट्टी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तानाजी सावंत हे सध्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आहेत.