Raju Shetti : शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली असं वकतव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादांचे भाषण ऐकले सारखं सारखं कर्जमाफी होणार नाही असं ते म्हणाले. दादा आम्ही सारखं कर्जमाफी मागत नाही. परिस्थिती निर्माण होते त्याला आम्ही तरी काय करणार? असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला. हमीभावापेक्षा शेतकरी कमी किंमतीने शेतमाल विकतोय. त्यामुळं शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्यामुळं सरकारकडे मदत मागावी लागते. शेती मालाला भाव मिळत नाही याचा सरकारशी धोरणाशी संबंध असल्याचे शेट्टी म्हणाले. 

Continues below advertisement

 सरकारची धोरणे चुकीची असल्याने त्याचे परिणाम आमच्यावर होतात

गेल्यावर्षी साखर निर्यातमध्ये बंदी घातली नसती तर आम्हाला पाच हजर रुपये दर मिळाला असता असे राजू शेट्टी म्हणाले. सरकारची धोरणे चुकीची असल्याने त्याचे परिणाम आमच्यावर होतात. म्हणून मदत मागतो, तुमची ती जबाबदारी आहे असे शेट्टी म्हणाले. 

उसाला दर मिळावा यासाठी आम्ही आहोत 

कोरोना काळात धर्म जात कुठं होती, कारण त्यावेळी संकट होतं त्यानंतर जर आपण स्थिरस्थावर झालो की हे विखारी विचार समोर यायला लागल्याचे कडू म्हणाले. काल दोन अडीच तास वाद घालून 30 जूनला 2026 का होईना सातबारा कोरा करायचं आश्वासन घेतले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो, तोपर्यंत जे थकबाकी दार शेतकरी आहेत त्यांना बँकेचा तगादा लावू नका अशी विनंती आहे असे शेट्टी म्हणाले. थकीत हंगाम संपला आहे, उसाचे उत्पादन घटले आहे. मला वाटत नाही कारखाने 30 जानेवारीच्या पुढं चालतील असे शेट्टी म्हणाले. ऊस तोडीला पैसे देऊ नका सगळ्यांना तोड मिळेल. उसाला दर मिळावा यासाठी आम्ही आहोत आम्ही यांना सोडत नाही असे शेट्टी म्हणाले. एफआरपी एकरकमी द्यावी, अशी मागणी केली आहे. पहिली उचल चांगली असेल तर आमचा प्रॉब्लेम सुटतो तर आमचं शून्य टक्के व्याज कर्ज फिटतं. यावर्षी FRP वर 200 ते 300 रुपये अधिक दिले पाहिजे असे शेट्टी म्हणाले. 

Continues below advertisement

कारखान्यावर कर्जाचा बोजा पडतो म्हणून शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यात FRP दिली जाते

नुकसान भरपाईच्या कोणत्याही निकषांवर ऊस उत्पादक शेतकरी बसत नाही. कारखान्यावर कर्जाचा बोजा पडतो म्हणून शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यात  FRP दिली जाते. हे बरोबर नाही. आम्ही एफआरपी च्या बाजूला एकरकमी द्या अशी मागणी केली आहे.  त्याच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयातील हे काय बरोबर नाही असे शेट्टी म्हणाले.