Raju Shetti : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजकाल रॅाबिन हूड सारखे वागू लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देवून सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणे, चुकीच्या गोष्टीला पाठिशी घालणे, प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडणे, अशा प्रकारची दादागिरी अजित पावर यांची असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केले.  

Continues below advertisement

राजकीय परिस्थितीचा लाभ घेऊन 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचवला

2014 ते 2019  या काळात ज्या पद्धतीने त्यांनी दादागिरी करुन अडचणीत आले होते. त्याच रस्त्याने त पुन्हा चालले आहेत. पण आम्ही आता गप्प बसणार नाही. तुम्ही दादागिरी करुन, राजकीय परिस्थितीचा लाभ घेऊन 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचवला. आता दादागिरी करुन सरकारवर दबाव आणून, नियबाह्य रित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वत:च्या अध्यक्षेतेखाली नेमूण तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडणार असाल तर त्यातला एक रुपयाही तुम्हाला पचू देणार नाही. सुप्रिम कोर्टात जाणार, रस्त्यावर उतरुन तुम्हाला गुडघे टेकायला लावून पै न पै वसुल केल्याशिवाय राहणार नाही असे राजू शेट्टी म्हणाले. अजित पवारांनी स्वत:ला रॅाबिन हूड समजून दामदाटी करू नये त्यांची दादागिरी मोडून काढू असा इशारा देखील शेट्टींनी दिला.

खराब रस्ते, वाहनांच्या रांगाच्या रांगा, प्रवासास होणारा विलंब, मग प्रवाशांनी टोल का द्यावा? 

खराब रस्ते, वाहनांच्या रांगाच्या रांगा, प्रवासास होणारा विलंब, मग प्रवाशांनी टोल का द्यावा? या मुद्यावरुन केरळ उच्च न्यायालयानं, जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही आणि प्रवाशांचा वेळ वाचत नाही तोपर्यंत टोलआकारताना येणार नाही, असा निकाल दिला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 26 ऑगस्टला मी स्वत:मुंबईतील कोर्टात याचिका दाखल केली आहे. याबाबत सरकारनं लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. 

Continues below advertisement

कोल्हापूरपासून पुण्यात पोहोचालयला सात तास लागततात

कोल्हापूरपासून पुण्यात पोहोचालयला सात तास लागत आहेत. टोलनाख्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. जो प्रवास सव्वा तीन तासात व्हायला पाहिजे त्यालतर सात लागले तर प्रवाशंनी टोला का द्यावा? असा सवाल शेट्टी यांनी केला. 

महत्वाच्या बातम्या:

पाचशे एकराचा आरोप करूनही राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरलकेच नाहीत; म्हणाले, राजू शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये