मुंबई : जनतेच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, दंगलीत समोरासमोर उभे राहणारे, पोलिसांच्या काठ्या अंगावर झेलत हिंदूंचे रक्षण करणारे शिवसेना कार्यकर्ते घडले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावशाली वक्‍तृत्वाने अन्‌ प्रखर विचारांनी. शिवसेनाप्रमुखांचे गारूड मराठी माणूस व हिंदू जनतेच्या मनावर झाले. शिवसेनेचे लोण मुंबई, ठाण्यानंतर ऐतिहासिक औरंगाबादमधून संपूर्ण मराठवाड्यात पोहचले. बाळासाहेबांची ज्या मैदानात सभा झाली तिथेच काल राज ठाकरेंची सभा झाली. त्यामुळे कालच्या सभेची शिवसेना प्रमुखांच्या त्या सभेशी तुलना होत आहे. 


1988  साली बाळासाहेब ठाकरे यांची  सभा या मैदानावर झाली होती. काल औरंगाबाद शहरात त्याच मैदानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होती.   शिवसेनाप्रमुखांचे गारूड मराठी माणूस व हिंदू जनतेच्या मनावर झाले. शिवसेनेचे लोण मुंबई, ठाण्यानंतर ऐतिहासिक औरंगाबादमधून संपूर्ण मराठवाड्यात पोहचले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरेच पुढे घेऊन जातील असं मनसेकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंची सभा ज्या मैदानावर झाली. बाळासाहेबांच्या 1988 मध्ये सभेनंतर शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर हळूहळू शिवसेनेचा मराठवाड्यात विस्तार झाला. या मैदानाचा असा इतिहास असल्यामुळेच आणि बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरे पुढे घेवून जातील असा प्रचार केला जात असल्याने कालच्या सभेची इथून पुढेही चर्चा होत राहणार आहे. 


पक्ष संघटन वाढवताना बाळासाहेबांनी कार्यकर्ते उभे केले. नेतृत्वाची फळी उभारली. पक्षाला कार्यक्रम दिला. अनेक परस्पर विरोधी भूमिकांही घेतल्या. त्यातून आजचा सत्ताधारी सेना पक्ष उभारायचा गेला आहे. तशी किमया करण्यासाठी फक्त कॅापी चालणार नाही असा सध्याच्या सेना प्रमुखांचा दावा आहे. 


मराठवाडा हा दिर्घकाळ निझामांच्या राजवटीखाली राहिला होता. इथे अनेक शहरांत मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या विरोधात भूमिका घेवूनच शिवसेना वाढली हे सत्य आहे. पण सेनेच्या धार्मिक भूमिकेमुळेच औरंगाबाद शहराचा विकास रखडला हेही वास्तव. आज राज यांच्या कडव्या भूमिकेमुळे…या मोठ्या सभेमुळे पुन्हा धार्मिक तणाव होतो का हे पहावे लागेल