लाईट बंद करायला सांगितल्यावर वायर कापणारा मनसैनिक हवा : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2018 03:20 PM (IST)
मराठवाड्यानंतर राज ठाकरेंनी आज धुळ्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला. याआधी खूप वर्षांपूर्वी धुळ्यात आलो होतो.. मात्र धुळे शहरात सुधारणांऐवजी बिघाडच अधिकच झाला, असं राज ठाकरे म्हणाले.
धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धुळ्यातील सभेत चेहऱ्यावर येत असलेला लाईट बंद करायला सांगितला. पण मंचावर उपस्थित असणाऱ्या एका कार्यकर्त्याने चक्क वायरच कापली. राज ठाकरेंनीही आपल्याला असाच मनसैनिक हवा, असं म्हणत डोक्याला हात लावला. मला असाच मनसैनिक अपेक्षित आहे, असं म्हटल्यानंतर सभागृहात एकच टाळ्यांचा कळकळाट झाला. मराठवाड्यानंतर राज ठाकरेंनी आज धुळ्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला. याआधी खूप वर्षांपूर्वी धुळ्यात आलो होतो.. मात्र धुळे शहरात सुधारणांऐवजी बिघाडच अधिकच झाला, असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे धुळ्याला पोहोचण्याआधी महामार्गावरुन जात असताना त्यांची गाडी वाहतूक पोलिसांनी थांबवली. अर्थात राज ठाकरेंच्या चालकाने सीटबेल्ट लावला होता. मात्र वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांनी राज ठाकरेंना त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली. राज ठाकरेंनीही त्याची माहिती घेत या उपक्रमाचं तोंडभरुन कौतुक केलं. पाहा संपूर्ण भाषण