Raj Theckrey: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Theckrey) यांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे, ते मतदारसंघात बैठका, सभा, दौरे करताना दिसत आहेत. अशातच त्यांनी साेलापूर दौऱ्यावरती असताना आरक्षणाच्या बाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्या गाेष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. व्यवस्थित पैशांचे नियाेजन केले पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Theckrey) यांनी साेमवारी मांडली. त्यानंतर आता त्यांच्यावरती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हल्लाबोल केला आहे. 


आरक्षणाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका राज ठाकरे (Raj Theckrey) यांनी बदलावी. आरक्षणाची गरज नाही असे त्यांनी केलेले चुकीचे विधान मागे घ्यावं. त्यांनी जर आरक्षण विरोधी भूमिका कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे उमेदवारांवर दलित आदिवासी ओबीसी बहुजनांनी बहिष्कार घालावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे. 


काय म्हणाले होते राज ठाकरे? 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Theckrey) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज ठाकरे (Raj Theckrey) यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असे वक्तव्य केले होते. यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजचं नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य राज ठाकरेंनी (Raj Theckrey) सोलापूर दौऱ्यात केले.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे (Raj Theckrey) म्हणाले, महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातील मुले येतात आणि आपल्या नाेकऱ्या घेतात. भूमिपुत्रांना चांगल्या नाेकऱ्या मिळायला हव्या. यावेळी मनसेकडून शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.