Raj Thackeray Pune Rally Updates : त्यांचं हिंदुत्व पोकळ, आमचं हिंदुत्व रिझल्ट देणारं : राज ठाकरे
Raj Thackeray Pune Rally News Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे.
Maharashtra News : औरंगजेबाच्या कबरीला राज्य सरकारने सुरक्षा दिली आहे. महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या औरंगजेबाने हिंदू संस्कृतीवर हल्ला केला. आता औरंगजेबाच्या कबरीवर कारसेवा करण्याची गरज आहे. हे काम राज्य सरकारने केले पाहिजे की भाजप आणि हिंदुत्व संघटना येत्या काळात हे काम करतील.
Maharashtra News : भाजपमुळेच राज ठाकरेंच्या पक्षाची अशी अवस्था झाली. राज ठाकरेंनाही अयोध्येला जाण्याचा बेत रद्द करावा लागला, राज ठाकरेंच्या सभेनंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिलीये.
Maharashtra News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भाजपची बी टीम बनली आहे, राज ठाकरे आरएसएस आणि भाजपचा अजेंडा घेऊन पुढे जात आहेत.
औरंगाबादचे नाव बदला, मग सर्वप्रथम अहमदाबादचे नाव बदला, असे आवाहन राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केले आहे.गुजरातमध्ये अनेक ठिकाणे आहेत ज्यांची नावे आधी बदलावी.
राज ठाकरे आता हे का करत आहेत हे समजण्यापलीकडचे आहे, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासाठी काय केले, महाराष्ट्रात तीन वेळा केंद्राकडून मदत मिळाली नाही, तर मोदीजींचा गुजरात दौरा सुरू झाला आहे.
भाई जगताप (मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)
Raj Thackeray : औरंगाबादचं नामांतर झालं, की मग मतं मागायची कशावरं? औरंगाबाद नामांतरावर युटर्न घेणार उद्धव ठाकरे हे आहेत कोण? औरंगाबादमधील समस्यांचा विचार कोणी करणार की नाही? : राज ठाकरे
Raj Thackeray : उद्धव ठाकरे आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का तुमच्या अंगावर? राज ठाकरेंचा थेट सवाल
Raj Thackeray : पाकिस्तानी कलाकारांना देशातून मनसेनंच हुसकावून लावलं ना? रझा अकादमीच्या विरोधात फक्त मनसे उभी राहिली : राज ठाकरे
Raj Thackeray : राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात हा आरोप खोटा, आजवरचं एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं दाखवा, टोलनाक्यांच्या आंदोलनामुळे तब्बल 70 टोलनाके बंद झाले : राज ठाकरे
Raj Thackeray : परप्रांतियांनी शिविगाळ केल्यानंच परप्रांतियांच्या विरोधातलं आंदोलन घडलं, परीक्षेच्या सर्व जाहिराती परराज्यात कशा? महाराष्ट्रातील नोकऱ्या महाराष्ट्रातील मुलांना कळायला नको? : राज ठाकरे
Raj Thackeray : त्यांचं हिंदुत्व पोकळ, आमचं हिंदुत्व रिझल्ट देणारं, हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर
त्यांचं हिंदुत्व पोकळ, आमचं हिंदुत्व रिझल्ट देणारं, हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर
Raj Thackeray : शिवसेनासेना आणि राणांमध्ये मुंबई इतका राडा झाला, राणा दाम्पत्याला 14 दिवस तुरुंगात डांबलं, त्यानंतर राऊत-राणा लडाखमध्ये एकत्र कसे फिरले? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray : काहीजण अयोध्या दौऱ्याला विरोध करतायत, माफी मागायला लावणारे गेल्या 15 वर्षांपासून झोपले होते का? उत्तर भारतीय नेत्यांना राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray : अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली : राज ठाकरे
Raj Thackeray : सध्या पावसाचं वातावरण, निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं? राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला #Maharashtra
काही वेळातच राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला सुरुवात होणार आहे.. राज ठाकरे त्यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानाहून गणेश कला क्रीडा मंचाकडे रवाना होतील.. त्यापूर्वी मनसेचे प्रमुख नेते सभेच्या ठिकाणी दाखल झालेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे देखील सभेच्या ठिकाणी पोहोचलेत.. त्याशिवाय राज्यभरातून दाखल झालेल्या मनसैनिकांनी सभागृह भरलंय.. आता उत्सुकता आहे ती राज ठाकरेंच्या भाषणाची..
राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा 'नाराजी बॉम्ब'; म्हणाले पक्षातील काही पार्ट टाईम लोकं...
सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...
https://marathi.abplive.com/news/maharashtra/raj-thackeray-pune-rally-news-updates-vasant-more-nilesh-mojhire-facebook-live-news-1061939
ज्या अयोध्या दौऱ्याचा एवढा दिवस गाजावाजा सुरु होता, तो दौरा राज ठाकरेंनी एकाएकी रद्द का केला.? मशिदींवरच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर सडकून टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसेप्रमुख प्रत्युत्तर देणार का? उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण यांचं थेट आव्हान राज ठाकरे स्वीकारणार का? यासह अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.
राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी आणि त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार आहे. थोड्याच वेळात राज ठाकरेंची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा सुरु होईल. राज ठाकरे या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक पुण्यात दाखल झालेत.
राज ठाकरेंच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीसांची सुरक्षा व्यवस्था, वर्दीतील पोलिसांबरोबरच साध्या वेशातील पोलीसही गणेश कला क्रीडा रंगमंच सभागृहाच्या चारही बाजूंना तैनात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुणे येथे इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांची सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर चर्चा झाली..
राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपला दौरा स्थगित केला. राज ठाकरे यांच्या पायावर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया होणार आहे. राज यांच्या पायाचं दुखणं वर्षभरापूर्वीचं आहे. परंतु जुनं दुखणं पुन्हा बळावल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray Pune Rally News Updates : राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray Pune Rally News Updates : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार की बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Raj Thackeray Pune Rally News Updates : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार की बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेबाबात राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यासोबत बैठक घेतली. बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं की, नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध केला होता. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्यावर टीका केली होती. "माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या," असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता.
राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया
राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपला दौरा स्थगित केला. राज ठाकरे यांच्या पायावर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया होणार आहे. राज यांच्या पायाचं दुखणं वर्षभरापूर्वीचं आहे. परंतु जुनं दुखणं पुन्हा बळावल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -