मुंबई : सर्व नागरिकांनी देशात लावलेला लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. तर लॉकडाऊनची शिस्त पाळली नाही तर अर्थिकसंकट निर्माण होईल, अशी भितीही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि देशातील लॉकडाऊन यावर भाष्य केलं आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून एवढी शांतता 1992-93 च्या दंगलीदरम्यानही पाहिली नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.


कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं आहे. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे. 'दिवे लावून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून परिणाम होणार असेल तर होऊ दे, पण नुसतं दिवे लावण्याचं आवाहन करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात आशेचा किरण दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. उद्या जर उद्योगधंदे बंद झाले, तर त्याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होणार आहे. यावर पंतप्रधानांनी बोलणं अपेक्षीत होतं.


पाहा व्हिडीओ : मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे



राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमावरही भाष्य केलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच'


कोरोनाचा फायदा घेऊन अन्नधान्याचा काळाबाज करणाऱ्यांनाही फोडून काढलं पाहिजे, असं वक्तव्यही राज ठाकरेंनी केलं आहे. तसेच याबाबत बोलताना त्यांनी 'ही काळा बाजार करण्याची वेळ आहे का?' असा सवाल राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'हात उचलायची हिंमत होते कशी? पोलिसांना तुम्ही शिव्या देता? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. 'मी मुख्यमंत्र्यांना यावर कडक पावलं उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे', अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.


संबंधित बातम्या : 


Coronavirus : तब्लिगींचा फटका कोकणालाही, मरकजला गेलेल्या रत्नागिरीतील व्यक्तिला कोरोनाची लागण