उस्मानाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर आहेत की न्यायालयीन सुनावणीसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण 2008 च्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे आज परांडा आणि उस्मानाबाद न्यायालयात हजर राहणार आहेत.
राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता परांडा न्यायालयात हजर राहणार आहेत तर तर दुपारी साडे बारा वाजता उस्मानाबाद न्यायालयात उपस्थित राहतील.
राज ठाकरेंना काल निलंगा कोर्टाकडून 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला होता. शिवाय त्यांना 2000 रुपयांचा दंडही ठोठावला होता
राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी मराठवाड्यात होचले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत. मात्र या दुष्काळ दौऱ्यातच राज ठाकरे कोर्टाचे खटले आटोपून घेत आहेत.
राज ठाकरेंचे आजचे कार्यक्रम -
सकाळी 10 वाजता - सोलापूर मडकी वस्ती येथे विंदन विहीर व पाईप लाईन कामाचा शुभारंभ
सकाळी 11.00 वाजता परांडा न्यायालयात उपस्थिती
दुपारी 12.30 वाजता उस्मानाबाद न्यायालयात उपस्थिती
दुपारी 1.15 वाजता तुळजापूर शासकीय विश्राम गृह भेटीगाठी
दुपारी 3 वाजता नळ दुर्ग किल्ल्याची पाहणी
सायंकाळी 5 वाजता सोलापूर येथे गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ
सायंकाळी 5.30 सोलापूर शहर हिपरगा तलावास भेट