अहमदनगर : बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरीयतसारखा कायदा देशात लागू करण्याची गरज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. राज यांनी कोपर्डीतील बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली.


 
बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय तोडले पाहिजेत, अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला पर्याय शोधला पाहिजे. नुसते शस्त्र परवाने देऊन उपयोग नाही, कायद्याचा धाक निर्माण करा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

 
सरकार बदलले आहे याची लोकांना जाणीव होवू द्या, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट देऊन निर्भयाच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्याचप्रमाणे संबंधित कुटुंबाला शस्त्र परवाना देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

 

मुख्यमंत्र्यांकडून निर्भयाच्या कुटुंबीयांचं सांत्वन


 
मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते. पीडित कुटुंबाची काही वेळ भेट घेऊन मुख्यमंत्री माघारी परतले. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही.

 

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आठवलेंचा कोपर्डी दौरा रद्द


 
यापूर्वी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनीही कोपर्डीत पीडीत मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना कोपर्डीत येण्यापासून रोखलं गेलं.