Raj Thackeray:  महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट पसरली. या संताप विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारला हिंदी सक्तीचा जीआरद्द करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आज (5 जुलै) विजय मेळावा वरळी डोममध्ये झाला. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून घणाघाती प्रचार केला. राज ठाकरे यांनी बोलताना सुरुवातीलाच सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत मी उपस्थितांचे मनी जिंकली. त्यानंतर त्यांनी नेहमी प्रमाणे माझ्या जमलेल्या दमा मराठी बांधवांनो अशी सुरुवात केली. आजवर कोणालाच जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवल्याचा टोलाही राज यांनी लगावला. 

Continues below advertisement



आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर


राज म्हणाले की, आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही. कुणाला न विचारता निर्णय लादला. तुमच्याकडे सत्ता आहे विधान भवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. दादासाहेब भुसे आले होते म्हणत होते मी काय बोलतो ते ऐकून घ्या. मी म्हणालो ऐकून घेईल पण ऐकून घेणार नाही. मला म्हणे केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी मुद्दा आहे. महाराष्ट्रात यांनी प्रयत्न करून पाहिला. दक्षिणेतील राज्य याना विचारत पण नाही त्याशिवाय का यांनी माघार घेतली. उत्तर प्रदेश बिहार राजस्थान कोणता विषय तिसरा घेणार आहेत. मराठीच तिसरा विषय घ्यायला हवा. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? ते पुढे म्हणाले की, आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त 200 वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. याना काय मज्जाक वाटला का सक्ती करायला? अशी विचारणा त्यांनी केली. वेगळा ठिकाणी प्रयत्न करून पहिले. ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकले मग काय झालं?? देवेंद्र फडणवीस इंग्रजी शाळेत शिकले दादा भुसे मराठी शाळेत शिकून मंत्री झाले. कुणाची मुले कुठे शिकतात याची लिस्ट आहे आमच्याकडे असे सांगत त्यांनी देशातील नेत्यांची यादीच वाचून दाखवली. 


इतर महत्वाच्या बातम्या