सोलापूर/कोल्हापूर : राज्यातील विविध भागात पावसाने गारांसह हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहराला पावसाने झोडपून काढलं, तर जोरदार गाराही बरसल्या. विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पाऊस झाला. तर सोलापुरातही पावसाने हजेरी लावली.
सोलापूर विद्यापीठ परिसरात काही वेळ पाऊस झाला. राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असताना अचानक आलेल्या या पावसाने सोलापूर आणि कोल्हापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, यापूर्वी राज्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे पावसाचं वातावरण दिसताच शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरुन नुकसान टाळता येईल.
सोलापुरात पावसाची हजेरी, कोल्हापूरलाही पावसाने गारांसह झोडपलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2018 07:28 PM (IST)
विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पाऊस झाला. तर सोलापुरातही पावसाने हजेरी लावली. सोलापूर विद्यापीठ परिसरात काही वेळ पाऊस झाला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -