पुणे शहरात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने, शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 11 हजार 700 क्युसेक पाण्याचा मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रा लगत राहणार्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पात्रात 500 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गात वाढ होवू शकते, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. जून आणि जुलैत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे पुणेकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खडकवासला पूर्ण भरले असून या चार धरणात मिळून 64 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील चार दिवस या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून धरणे भरली तर या भागातील शेतीचाही प्रश्न सुटणार आहे
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय
कोयना धरण क्षेत्रातीही मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. परिणामी कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. कोयना धरण प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. कोयना धरण परिसरात पाऊसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातला पाणीसाठा 80 टीएमसी इतका झाला आहे. तर नीरा खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने निरा नदीवर असलेले वीर धरण हे आज शंभर टक्के भरले असून या धरणातून 1950 क्यूसेस पाणी हे नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकड़ून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
यंदा पावसाने सुरुवातीच्या काळातच हजेरी लावण्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या होत्या. मात्र जुलै महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, गेल्या 24 तासांपासून अनेक भागात दमदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरिपातील कापूस, ज्वारी उडीद मूग सोयाबीन या सारख्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने शेतकऱ्याच्या मध्ये समाधान आहे. मात्र, शहरी भागात चाकरमानी आणि हॉकर्सला मात्र या सततच्या पावसाने फटका बसला असल्याने शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून सध्या सरींवर सळी कोसळत आहे. मागच्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यातून दडी मारलेल्या पावसाने कालपासून पुनरागमन केले आहे. काल दिवसभर सर्वत्र सर्वदूर पाऊस झाल्यानंतर आज पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यावर्षी पिकांना हवा तसा आणि वेळेवर पाऊस होत असल्याने जिल्ह्यात सर्वत्रच कापुस, सोयाबीन, मुग आदी पीक जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू झालाय.
Satara Veer Dam | सातारा जिल्ह्यातील वीर धरण 100 टक्के भरलं