मुंबई : गेल्या तीन-चार दिवसात पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडले असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीन-चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.  

राज्यात 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद

महाराष्ट्रात 1 जूनपासून सर्वत्र सरासरी पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात काल म्हणजेच 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. 40 दिवसांत मान्सूनने संपूर्ण भारताचा प्रवास केला. दिल्लीत तब्बल 19 वर्षांनंतर मान्सून उशिराने दाखल झाला असून याआधी 2002 साली मान्सून 19 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाला होता.

पावसाची आकडेवारी (1 जूनपासून आजपर्यंत) 

कोकण आणि गोवा विभाग 

  • डहाणू - 757 मिमी
  • गोवा(पणजी) - 1327 मिमी
  • हरणाई - 1547 मिमी
  • मुंबई (कुलाबा) - 893 मिमी 
  • मुंबई (सांताक्रुज) - 1164 मिमी
  • रत्नागिरी - 1780 मिमी

मध्य महाराष्ट्र

  • जळगाव - 104 मिमी
  • जेऊर - 165 मिमी 
  • कोल्हापूर - 347 मिमी 
  • महाबळेश्वर - 1650 मिमी
  • मालेगाव - 128 मिमी
  • नाशिक - 107 मिमी
  • पुणे - 167 मिमी
  • पुणे (लोहगाव) - 179 मिमी 
  • सांगली - 285 मिमी
  • सातारा - 348 मिमी
  • सोलापूर - 184 मिमी

मराठवाडा  

  • औरंगाबाद - 279 मिमी
  • नांदेड - 495 मिमी
  • उस्मानाबाद - 230 मिमी 
  • परभणी - 613 मिमी

विदर्भ 

  • अकोला - 279 मिमी
  • अमरावती - 369 मिमी 
  • ब्रह्मपुरी - 358 मिमी
  • बुलढाणा - 158 मिमी
  • चंद्रपूर - 420 मिमी
  • नागपूर - 383 मिमी