मुंबई : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गासह आता पनवेलमध्ये अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरात विजेच्या कडकडासह पाऊस झाला. तर तिकडे सिंधुदुर्गतील कुडाळ तालुक्याला पावसाने झोडपलं. तर सांगलीत वीज अंगावर पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.


पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ-झारापदरम्यानची वाहतूक धिम्या गतीनं सुरु होती. काही ठिकाणी टेलिफोन सेवा ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील नांदगाव, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वेगुर्ले, मालवण  तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला.

पनवेलमध्येही संध्याकाळच्या सुमारास जवळपास अर्धातास वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे नवीन पनवेल परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

सांगलीतील तासगाव तालुक्यातील वडगावमध्ये वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

तिकडे वाशिम शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. फक्त 10 ते 15 मिनिटं बरसलेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि वाशिमकरांची उन्हाच्या कडाक्यापासून सुटका झाली.

LIVE UPDATE

  • ठाणे, कल्याण, नवी मुंबईत पावसाला सुरुवात, पुणे आणि साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, तर महाबळेश्वरमध्ये गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात

  • अंधेरीतही पावसाच्या तुरळक सरी

  • अचानक आलेल्या पावसामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

  • रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये वादळी वाऱ्यासह, अवकाळी पावसाच्या सरी


संबंधित बातम्या


राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी