अकोला : रेल्वे अपघात घडवून मोठी जीवितहानी करण्याचं षडयंत्र असल्याचा संशय आता दृढ होऊ लागला आहे. कारण पनवेलजवळ रेल्वेच्या रुळावर वीजेचा पोल टाकल्याची घटना ताजी असतानाच, अकोल्यात रेल्वे मार्गावर मोठा दगड ठेवल्याचं आढळलं आहे.


7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना उघडकीस आली. अकोला-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर ही घटना घडली.

नवी मुंबईत रेल्वे रुळांवर विजेचा खांब, घातपाताचा संशय

बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड-अमानवाडी गावादरम्यान 25 ते 30 किलो वजनाचा मोठा दगड रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला होता. या मार्गावरुन इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार होती. सुदैवाने मोठा अपघात टळला.

या घटनेची चौकशी सध्या एटीएस, स्थानिक पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा करत असल्याचं कळतं.

दिवा-पनवेल मार्गावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला

दरम्यान, पनवेलमध्ये गव्हाणफाटाजवळ काल रेल्वे रुळावर वीजेचा पोल टाकण्यात आला होता. तर परवा कळंबोलीजवळ रेल्वे ट्रॅकवर रुळाचा तुकडा ठेवण्यात आला होता.