रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'निर्धार परिवर्तनचा' यात्रेनंतर आमदार अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट चालत मुक्कामाचं ठिकाण गाठलं. तब्बल सहा किलोमीटरचं अंतर दोघांनी चालत कापलं.


लोकांची काम करण्यासाठी स्वत: तंदुरुस्त राहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे संधी मिळाली तर दररोज चार ते पाच किलोमीटर चालतो, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरही नाईट वॉकचा व्हिडीओ शेअर केला आहे.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनचा यात्रेला सुरुवात झाली. रायगडावर दिवसभरात दोन सभा झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जाताना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी तब्बल सहा किमी नाईट वॉक केला.

अजित पवार आणि धनंजय मुंडे झपाझप अंतर कापत हसतमुखाने सर्वांशी संवाद साधत होते. दिवसभरांच्या सभांनंतर दोघेही ज्या तडफेने चालत होते ते पाहून भल्याभल्यांना कडाक्याच्या थंडीत घाम फुटला.